भाजप शिंदे युतीत फुट पडण्याची शक्यता?
2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 240 विधानसभा जागा लढवण्याच्या तयारीत आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत केवळ 50 आमदार आहेत, त्यांना यापेक्षा जास्त जागांची गरज नाही असे चंद्रशेखर बावनकुळे जागा वाटपाच्या मुद्द्यावरून म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजप शिंदे युतीत फुट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात पुन्हा पावसाचे थैमान; अलर्ट जारी
महाराष्ट्रातील काही ठिकाणी गारपीटीसह पाऊस बरसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. आता राज्यात पुन्हा हवामाखात्याने यलो अलर्ट दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी हवामान खात्याने आज पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. राजस्थान आणि उत्तर गुजरातमध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. या पोषक हवामान स्थितीमुळे राज्यात पावसाचा अंदाज आहे.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कोर्टाकडून दिलासा, अटक वॉरंट रद्द
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. कारण इस्लामाबाद अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आवारातूनच परत जाण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर न्यायालयाने तोशाखाना प्रकरणात खान यांच्याविरुद्धचे अटक वॉरंटही रद्द केले आहे.
गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत मोठी वाढ!
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडव्याचा सण बुधवारी (दि. 22) आहे. त्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात प्रतितोळा 3700 रुपयांनी तर चांदीच्या दरात प्रतिकिलो सहा हजारांची वाढ झाली आहे. 10 ते 18 मार्च या अवघ्या आठ दिवसांतील ही वाढ आहे. गुढपाडव्याच्या मुहुर्तावर सोन्याच्या किमती अजुन वाढण्याची शक्यता आहे.
आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना
आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा वनडे सामना होणार आहे. हा सामना विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा टीमचे नेतृत्व करणार आहे. पहिल्या वनडे सामन्यात हार्दिक पांड्याने संघाचे नेतृत्व केले होते. दरम्यान, पहिल्या वनडे सामन्यात भारताने विजय मिळवला होता. आता आजचा सामना जिंकून भारत मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://www.spreaditnow.in