शिंदे गट आणि भाजपाचा जागावाटपाचा फॉर्मुला ठरला!
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांमध्ये निवडणूक लढवली जाते. अशातच 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा 240 जागा लढवणार तर 48 जागा या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिल्या जाणार आहेत. 2024 मध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा एकत्र लढणार आहेत. त्यासाठीचा हा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे.
गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. अशातच आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्टाने रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना मोठा झटका दिला आहे. या युद्धादरम्यान इंटरनॅशनल क्रिमीनल कोर्टाने युक्रेनमधील युद्ध गुन्ह्यांसाठी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
जुनी पेन्शन मिळण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज पाचवा दिवस आहे. या संपात 18 लाख वैदयकीय, शिक्षक कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यांच्या या मागणीवर अद्यापही तोडगा निघालेला नाही. तसेच या संपामुळे रूग्ण आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. दरम्यान, या संपाच्या विरोधात वकिल गुणरत्न सदावर्तेंनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर येत्या 23 मार्चला सुनावणी होणार आहे.
लिंबाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ
सध्या उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. त्यामुळे लिंबाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. इथे 60 ते 80 रूपये किलो प्रमाणे लिंबाची विक्री केली जात आहे. तर किरकोळ बाजारात ग्राहकांना त्यासाठी 100 ते 120 रूपये मोजावे लागत आहेत. अवकाळी पावसाचा फटका लिंबाला बसल्याने त्याची आवक कमी झाली असल्याने लिंबाच्या दरात तेजी दिसत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु झाली आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. भारताला पहिल्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाने 189 धावांचं आव्हान दिल होतं. अशातच भारतीय संघाने 191 धाव करत दणदणीत विजय मिळवला आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा https://www.spreaditnow.in