नाशिकहून मुंबईच्या दिशेने काढण्यात आलेल्या शेतकरी लाँग मार्चला अखेर यश आलं आहे. शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा किसान लाँग मार्च स्थगित झाला आहे. यासंदर्भात निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी मोर्चेकरांना वाचून दाखवली आहे. अशी माहिती शेतकरी नेते जे.पी.गावित यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या लाँग मार्चबाबत विधानसभेत निवदेन करत मागण्या मान्य करत असल्याचं जाहीर केलं आहे. यामुळे कांद्याला देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. कांद्यामध्ये झालेली घसरण लक्षात घेऊन 300 रुपयांवरुन आणखी 50 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले आहेत.
मात्र या शेतकरी लाँग मार्च दरम्यान एक दुःखद घटना घडली आहे. या शेतकरी लॉन्ग मार्चमध्ये एका आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील पुंडलिक दादा जाधव या शेतकऱ्यास अस्वस्थ वाटू लागल्याने त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृताच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केल्याचे दादा भुसे यांनी सांगितले आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://www.spreaditnow.in