SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्प्रेडइट महत्वाच्या घडामोडी

आजपासून महिलांना ST प्रवासात 50 टक्के सवलत मिळणार!

अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत मिळणार अशा घोषणा केल्या होत्या. त्यामुळे आजपासून महिलांना  एसटी प्रवासात 50 टक्के सवलत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्व महिलांना आजपासून एसटी प्रवासात 50 टक्के सवलत मिळणार आहे. तसा राज्य सरकारचा शासन अध्यादेश (GR) जारी झाला आहे.

Advertisement

 

 

Advertisement
 भारतीय विद्यार्थ्यांची व्हिसा एजंटकडून फसवणूक

भारतीय विद्यार्थ्यांची व्हिसा एजंटकडून फसवणूक झाली आहे. कॅनडामधील 700 हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना आता पुन्हा मायदेशी परतावं लागणार आहे. या 700 विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या एजंटनी त्यांना बनावट व्हिसा देऊन कॅनडाला पाठवले होते. परिणामी आता या विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं आहे.  

 

Advertisement

 

पंतप्रधानांच्या हस्ते होणार मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचा शुभारंभ

Advertisement

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे कोच व पिट लाईन संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिवाळीपूर्वी होणार आहे. तसेच केंद्र सरकारकडून लातूर रेल्वे स्टेशनवर पिट लाईन उभारण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच पिट लाईन उभारण्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे वैष्णव म्हणाले.

 

 

Advertisement
कर्मचारी संपाचा आज चौथा दिवस

महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आज संपाचा चौथा दिवस आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपात शाळा, महाविद्यालयांपासून वैद्यकीय कर्मचारीही सहभागी झाले आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. मात्र असे असतानाही अद्याप या संपावर अजूनही तोडगा निघाला नाही. अशातच सरकार या कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisement

पांड्याच्या नेतृत्वात पहिला वनडे खेळणार टीम इंडिया

कसोटी मालिकेनंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून वनडे मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तीन सामन्यांची ही वनडे मालिका असणार आहे. पहिल्या वनडे सामन्यासाठी रोहित शर्मा उपस्थित नसल्याने हार्दीक पांड्याकडे संघाचे नेतृत्व असेल. दरम्यान, या सामन्याला आज दुपारी 1.30 वाजता सुरुवात होणार आहे.

Advertisement

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.  https://www.spreaditnow.in

Advertisement