केंद्रासह राज्य सरकारच्यावतीने उच्च शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्त्या जाहिर करण्यात आल्या आहेत. पदवी व पदव्यूत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने 31 मार्चपर्यंत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करा असे आवाहन करण्यात आले आहे.
कारण मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 78 टक्केच विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी नोंदणी केली आहे असे सामाजिक न्याय विभागाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीसाठी नोंदणी न करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने ते योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांची जागृती करत अर्ज भरून घेणे व प्रंलंबित अर्ज निकाली काढावे, असे सामाजिक न्याय विभागाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना महाडिबीटी पोर्टलवर म्हणजेच https://mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावा लागणार आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://www.spreaditnow.in