कसोटी मालिकेनंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्यापासून (17 मार्च) वनडे मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तीन सामन्यांची ही वनडे मालिका असणार आहे. दरम्यान भारताने कसोटी मालिका जिंकली आहे त्यामुळे आता वनडे मालिकाही जिंकणार का याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असणार आहे. रोहित शर्मा पहिल्या सामन्यात खेळणार नाही. हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करणार आहे. मात्र संपूर्ण मालिकेत हार्दिक पांड्या उपकर्णधार असणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सर्व एकदिवसीय सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहेत.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका वेळापत्रक :
पहिला सामना – 17 मार्च 2023 – मुंबई
दुसरा सामना – 19 मार्च 2023 – विशाखापट्टणम
तिसरा सामना – 22 मार्च 2023 – चेन्नई
असा असेल भारताचा एकदिवसीय संघ!
रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट
असा असेल ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ!
स्टीव्ह स्मिथ, शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://www.spreaditnow.in