महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या एका वर्षावर आल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीने लोकसभा निवडणूक एकत्रच लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे. या फॉर्म्युल्यानुसार 48 जागांपैकी ठाकरे गटाला 21, राष्ट्रवादीला 19 आणि काँग्रेसला 8 जागा मिळणार आहेत.
भारतीय वंशाचे रवी चौधरी यांची अमेरिकेच्या संरक्षण उपमंत्रीपदी निवड
भारतीय वंशाचे रवि चौधरी यांची अमेरिकेच्या संरक्षण उपमंत्रीपदी निवड झाली आहे. त्यांच्याकडे अमेरिकी हवाई दलाची जबाबदारी असणार आहे. पेंटागनमधील सर्वोच्च पदांपैकी हे एक पद आहे. रवी चौधरी यांनी यापूर्वी अमेरिकेच्या परिवहन विभागामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
‘या’ दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या हस्ते होणार राम मंदिराच्या मूर्तीची स्थापना
अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरात रामाची मूर्ती कधी बसवली जाणार याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी 2024 च्या तिसर्या आठवड्यात भगवान रामलीलाच्या मूर्तीची अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रतिष्ठापना करणार आहेत. अशी माहिती मूर्ती आणि राम मंदिराच्या व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टच्या प्रमुख सदस्याने दिली आहे.
किसान सभेच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
किसान सभेचा लाँग मार्च ठाणे जिल्ह्यात दाखल झाला आहे. मंत्री दादा भुसे आणि मंत्री अतुल सावे यांची अखिल भारतीय किसान सभेच्या नेत्यांसोबत बैठक झाली. त्यानंतर आज दुपारी तीन वाजता किसान सभेच्या नेत्यांना भुसे आणि अतुल सावे यांनी बैठकीचे निमंत्रण दिले आहे. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्रालयात होणार आहे.
अखेर आरसीबीने नोंदवला पहिला विजय!
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा १३वा सामना खेळला गेला. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने होते. आरसीबीची कर्णधार स्मृती मंधाना हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात आरसीबीने पाच विकेट्स आणि 12 चेंडू राखून युपीचा पराभव केला आहे. महिला आयपीएल स्पर्धेतील आरसीबीचा हा पहिलाच विजय मिळवला आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा https://www.spreaditnow.in