SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट महत्वाच्या घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस; रुग्णसेवेला मोठा फटका

जुनी पेन्शन योजना हा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. अशातच आता जुनी पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारमधील शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक संघटना यांनी संप पुकारला आहे. 14 मार्चपासून या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस आहे. या संपामुळे शिक्षण, आरोग्य संस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.

Advertisement

रशियाने अमेरिकेचं ड्रोन समुद्रात पाडलं

युक्रेन युद्धावरून रशिया व अमेरिकेत तणाव वाढत आहे. अशातच काळ्या समुद्रात रशियाच्या फायटर जेटने अमेरिकन हवाई दलाच्या एमक्यू-9 रीपर ड्रोनवर हल्ला केला आहे.  अमेरिकेच्या लष्कराने याबाबतची माहिती दिली आहे. समुद्र सीमेची पाहणी करताना रशियाचे जेट व अमेरिकेचे जेट आमने-सामने आले. त्यावेळी रशियाच्या जेटने वरून अमेरिकन ड्रोनवर तेल ओतण्यास सुरूवात केली. यामध्ये ड्रोनच्या प्रोपेलरचे नुकसान झाल्याने अमेरिकन सैन्याचं ड्रोन काळ्या समुद्रात कोसळलं.

Advertisement

सत्तासंघर्षावर आज सुनावणीचा शेवटचा दिवस

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात काही महिने सुरू असलेली सुनावणी आज सपंणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाचे युक्तिवाद पूर्ण झाले आहेत. आता निकालाच्या तारखेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आज सत्तासंघर्षांवर काय निर्णय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

नीट पीजी 2023 चा निकाल जाहीर
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झाम्स इन मेडिकल सायन्सेसने (NEET PG 2023) परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी नीट पीजी 2023 चा निकाल जाहीर झाला असल्याची माहिती ट्वीटद्वारे दिली. आरोग्यमंत्र्यांनी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे. 

मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये दाखल

Advertisement

वुमन्स प्रीमियर लीगमधील 12 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा 55 धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्स या विजयनानंतर प्ले ऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या या संघाने आतापर्यंत खेळलेले सर्व पाच सामने जिंकले आहेत. मुंबईने गुजरातसमोर 163 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ 107 धावत करू शकला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://www.spreaditnow.in

Advertisement