SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्प्रेडइट महत्वाच्या घडामोडी

जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्माचाऱ्यांचा बेमुदत संप

 जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. अशातच शिक्षक संघटनेने बारावीच्या परीक्षा घेणार पण संप काळात बारावी बोर्ड परीक्षा उत्तरपत्रिका तपासणार नाही अशी भूमिका घेतली आहे. तसेच अकरावीच्या परीक्षा, मूल्यमापन, अध्यापन करणार नसल्याची भूमिकाही स्पष्ट केली आहे. या संपामुळं शासकीय रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, नगरपालिका, जिल्हा परिषदा, तहसीलदार कार्यालये, यासह अनेक सरकारी विभागांचे कामकाज जवळपास ठप्प होणार आहे.

Advertisement

नौदलात 200 ब्रह्मोस मिसाईल दाखल होणार

भारत सातत्याने लष्करी ताकद वाढण्यावर भर देत आहे. अशातच आता 200 हून अधिक ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून याला लवकर मंजुरी मिळू शकते. या क्षेपणास्त्राचा वेग ताशी 4321 किमी आहे. तसेच ही क्षेपणास्त्रे युद्धनौका, पाणबुडी, विमान किंवा जमिनीवरुन डागता येतात. दरम्यान, यासाठी 20 हजार कोटींचा खर्च येण्याची शक्यता आहे.

Advertisement

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष आज पुन्हा सुनावणी

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सकाळी 11 वाजता सुनावणीस सुरूवात होईल. गेल्या सुनावणीत ठाकरे गटाचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर शिंदे गटाने युक्तीवाद करायला सुरुवात केली. आता आज शिंदे गटाचे वकील निरज किशन कौल आणि वकील हरीश साळवे युक्तीवाद करणार आहेत. तसेच राज्यपालांच्या वतीने सॉलिटर जनरल तुषार मेहता बाजू मांडणार आहेत.

Advertisement

शेतकरी राजा चिंतेत! हवामान विभागाकडून पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा

गेल्या काहीदिवसांपासून राज्यातील तापमानात सातत्याने चढ उतार होत आहे. अशातच हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  आजपासून राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस असणार आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात 16 आणि 17 मार्चला काही ठिकाणी गारपिटीसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहे.

Advertisement

दिल्ली कॅपिटल्सचा सहा विकेट राखून दणदणीत विजय

वुमेन्स प्रिमियर लीगमधील 11 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेजर्स बंगळुरूचा 6 विकेट राखून पराभव केला आहे. हा सामना स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली खेळाला जात आहे. या सामन्यात दिल्लीने आरसीबीवर सहा विकेट्सने विजय मिळवला आहे. आरसीबीचा हा सलग पाचवा पराभव आहे. आरसीबीने फलंदाजी करताना 150 धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना दिल्लीने 154 धावा केल्या आणि विजय नोंदवला आहे.

Advertisement