SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट महत्वाच्या घडामोडी


काँग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्यांनी पक्षाला ठोकला राम राम

आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी काँग्रेसला राम राम ठोकला आहे. किरण कुमार रेड्डी यांच्या राजीनाम्यानंतर रेड्डी भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चाना उधाण आलं आहे. या राजीनाम्यानंतर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी पक्षाकडून सर्व काही मिळवले आणि आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसला संपवण्याचे काम केलं त्यांनी आता भाजपमध्ये जावे, असे मत लोकसभा खासदार मणिकम टागोर यांनी व्यक्त केले.

Advertisement

राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्यावर भीमा सहकारी साखर कारखान्यात 500 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. याबद्दल त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित या घोटाळ्याबद्दल माहिती दिली आहे. तसेच या प्रकरणी कारवाईची मागणी देखील केली आहे.

Advertisement

 RRR मधील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्कर पुरस्कार

एस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात इतिहास रचला आहे. बेस्ट ओरिजिनल साँग विभागात ऑस्कर पुरस्कार पटकावणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. या विभागात ‘RRR’मधील ‘नाटू नाटू’सोबतच ‘टेल इट लाइक अ वुमन’मधील ‘अप्लाऊज’, ‘टॉप गन : मॅवरिक’मधील ‘होल्ड माय हँड’, ‘ब्लॅक पँथर : वकांडा फॉरेव्हर’मधील ‘लिफ्ट मी अप’ आणि ‘एवरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स’मधील ‘दिस इज अ लाइफ’ या गाण्यांना नामांकनं मिळाली होती.

Advertisement

 ग्लोबल सरफेसचा आयपीओ आजपासून खुला

ग्लोबल सरफेसचा आयपीओ आज खुला झाला आहे. यासाठी 133 ते 140 रूपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना यामध्ये येत्या 15 मार्चपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. शेअर्स ऍलॉटमेंट 20 मार्चला होईल. त्याचवेळी त्याची कंपनी 23 मार्चला लिस्ट होईल. आयपीओ 85.2 लाख नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. दरम्यान या 154.98 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे.

Advertisement

 मुंबई इंडियन्सचा दणदणीत विजय

महिला प्रीमियर लीगचा 10 वा सामना मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्या खेळवला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सवर 8 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला आहे. हरमनप्रीत कौर आणि सीवर ब्रंट यांच्या शानदार खेळीमुळे मुंबई इंडियन्सला हा सामना जिंकता आला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 4 सामने जिंकले आहेत.

Advertisement

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा  https://www.spreaditnow.in

Advertisement