SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट महत्वाच्या घडामोडी

कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन 

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत.  हवामान विभागानं  दिलेल्या अंदाजानुसार 13 ते 15 मार्चदरम्यान राज्याच्या पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामूळे शेतकरी बांधवांनी हरभरा, गहू पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करुन सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. 

दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय

Advertisement

महिला प्रीमियर लीगमध्ये आज गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा एकतर्फी विजय झाला आहे. दिल्लीने गुजरातवर 10 विकेट्सने विजय मिळवला आहे.

गुलाबराव पाटलांनी केला मोठा गौप्यस्पोट

Advertisement

मंत्री पदाचा सट्टा लाऊन आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतला असं खळबळजनक वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भोरखेडा येथे केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा उधाण आल आहे.

चीनच्या पंतप्रधानपदी ली कियांग

Advertisement

चीनच्या लोकप्रतिनिधीगृहाने राष्ट्राध्यक्ष क्षी जिनिपग यांचे जवळचे सहकारी ली कियांग यांच्या पंतप्रधानपदावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.  विद्यमान पंतप्रधान ले केकियांग यांच्याकडून ते सूत्रे घेणार आहेत. पंतप्रधानपदी ली कियांग यांच्या नावाचा प्रस्ताव स्वत: अध्यक्ष क्षी जिनिपग यांनी मांडल्यानंतर या काँग्रेसने त्यांच्या उमेदवारीस मान्यता दिली.

राज्यसभेत व्हीप म्हणून खासदार रजनीताई पाटील यांची नियुक्ती

Advertisement

राज्यसभेत काँग्रेसने व्हीप म्हणून खासदार रजनीताई पाटील यांची नियुक्ती केली आहे. तर उत्तर प्रदेशातील आपले ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांची राज्यसभेतील उपनेतेपदी निवड करण्या आली आहे.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.  https://www.spreaditnow.in

Advertisement