– फोन पाण्यात पडल्याबरोवर ताबडतोब बंद करावा. फोन बंद नसल्यास शॉट सर्किट होऊ शकतो.
– फोन बंद केल्यानंतर त्याचे सर्व पार्ट वेगवेगळे करा. महत्त्वाचे म्हणजे बॅटरी किंवा सिम कार्ड आणि मेमरी कार्ड वेगळे करा आणि कोरड्या कपड्यावर ठेवा.
– फोनचे सर्व पार्ट वेगळे केल्यानंतर तुम्हाला फोनचे सर्व भाग सुकवावे लागतील. यासाठी तुम्ही सुती कापडाचा वापर करू शकता.
– बाहेरून कोरडे केल्यानंतर फोन आतून सुकणे देखील आवश्यक आहे. यासाठी फोन एका भांड्यात कोरड्या तांदळात दाबून ठेवा. तांदूळ ओलावा लवकर शोषुन घेतो. याशिवाय जर तुमच्याकडे सिलिका जेल पॅक असेल तर तुम्ही ते वापरू शकता. सिलिका जेल पॅक शू बॉक्स किंवा गॅझेट बॉक्स इत्यादींमध्ये ठेवले जातात. ते भातापेक्षा जास्त ओलावा शोषून घेतात. तुम्हाला फोन किमान 24 तास सिलिका पॅक किंवा तांदळाच्या भांड्यात ठेवावा लागेल.
– 24 तासांनंतर फोन आणि फोनचे सर्व एक्सेसरीज कोरडे झाल्यावर ते चालू करा. जर फोन आता चालू होत नसेल तर तो सेवा केंद्रात घेऊन जावे.