SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चौथ्या दिवशी टीम इंडिया मजबूत स्थितीत!

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांची कसोटी मालिका सध्या 2-1 अशी आहे. यातील पहिले दोन सामने भारताने जिंकले आहेत, तर तिसऱ्या कसोटीत भारताला 9 विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते. अशात मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. उभय संघातील चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 480 धावांचे लक्ष ठेवले आहे.

भारताचा स्कोर 362/4 आहे. भारतीय संघ अजूनही ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येपेक्षा 118 धावांनी मागे आहे. विराट कोहली 88 आणि श्रीकर भरत 25 धावांवर खेळत आहे. दुसऱ्या सत्रात कोहली आपले शतक पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर भारतीय संघाला वेगवान धावा करून ऑस्ट्रेलियाची आघाडी संपवायची आहे.

Advertisement

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://www.spreaditnow.in

Advertisement