SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट महत्वाच्या घडामोडी


हसन मुश्रीफांच्या घरी पुन्हा ईडीचा छापा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आज पुन्हा एकदा ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आली. यामुळे राष्ट्रवादीला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.

Advertisement

रशिया आणि युद्धावर अमेरिकन गुप्तचर विभागाचा मोठा दावा

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध चालू आहे. अशातच अमेरिकन गुप्तचर विभागानं मोठा दावा केला आहे. जर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन जिंकले नाहीत तर हे युद्ध संपवण्यासाठी आणि युक्रेनला उद्ध्वस्त करण्यासाठी ते अण्वस्त्र हल्ला करू शकतात. असे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचं म्हणणं आहे.

Advertisement

वयोमर्यादा शिथिल! एमपीएससीकडून परिपत्रक जारी

MPSC कडून 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींमध्ये उमेदवाराची वयोमर्यादा संपुष्टात आल्यास विहित कमाल वयोमर्यादेमध्ये दोन वर्षाची शिथिलता देण्यात येणार आहे. या संदर्भात एमपीएससीने आज परिपत्रक जारी केले आहे.

Advertisement

उत्तर भारतात पावसाची शक्यता

उत्तर भारतातील पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने हवामान खात्याने पाऊसाचा अंदाज वर्तवला आहे. 13 ते 15 मार्च या कालावधीत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मात्र त्यानंतर लगेच कमाल तापमानात वाढ होऊन उकाड्यास सुरुवात होणार आहे.

Advertisement

यूपी वॉरियर्सने 10 गडी राखून मिळवला विजय

महिला प्रिमीयर लीगचा आठवा सामना रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर आणि युपी वॉरियर्स यांच्यात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झाला. RCB ने 20 षटकात 138 धावांचं आव्हान यूपी वॉरियर्सला दिलं होतं. यूपी वॉरियर्सने 139 धावा घेत दणदणीत विजय मिळवला आहे. 

Advertisement

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://www.spreaditnow.in

Advertisement