SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट महत्वाच्या घडामोडी

भाजपाची राजेशाहीकडे वाटचाल, काँग्रेसची टीका

घराणेशाहीच्या नावाने बोंब ठोकणाऱ्या भाजपाची राजेशाहीकडे वाटचाल चालली आहे. विविध योजनांना नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. तसेच नरेंद्र मोदी यांचं नाव स्टेडियमलाही देण्यात आलं आहे. त्यावरून आता काँग्रेस आक्रमक झाल्याचं दिसतं आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी याबाबत ट्विट करत भाजपाची वाटचाल ही राजेशाहीकडे चालली आहे असं म्हटलं आहे.

Advertisement

आंतरराष्ट्रीय बाजारात मका पिकाच्या मागणीत मोठी वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात मका पिकाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 2022-23 मध्ये मका पिकाची निर्यात 1.5 टक्क्यांची वाढली आहे. या वर्षात 6 हजार 507 कोटी रुपयांची मका निर्यात झाल्याची माहिती कृषी मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे भारतातून होणारी मका निर्यात वाढली आहे.

Advertisement

आजपासून विधीमंडळात अर्थसंकल्पावर चर्चा

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. आजपासून सभागृहात त्या अर्थसंकल्पावर 293 अन्वये चर्चा होणार आहे. त्याच बरोबर आठवड्याभरापासून प्रलंबित प्रश्नांवर देखील चर्चा होणार आहे. काल सादर केलेल्या अर्थसंकल्पात घोषणा आणि योजनांचा पाऊस पाडण्यात आला. यावर विरोधकांनी मुळ प्रश्नांना बगल देणारा चुनावी अर्थसंकल्प असल्याची टीका केली आहे.

Advertisement

सोशल मीडियावर व्हायरल वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांचा हिंदीचा पेपर बुडाला

दहावीच्या विद्यार्थ्यांचा हिंदी विषयाचा पेपर बुडाल्याची माहिती मिळत आहे. कारण सोशल मीडियावर दहावीच्या हिंदी विषयाच चुकीचं वेळापत्रक व्हायरल झालं होतं. बोर्डाच्या वेळापत्रकात जो पेपर 8 मार्चला दाखवण्यात आला होता. तोच पेपर व्हायरल वेळापत्रकात 9 मार्चला दाखवण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आणि अनेक विद्यार्थ्यांचा हिंदीचा पेपर बुडाला. 

Advertisement

मुंबई इंडियन्सची विजयाची हॅट्रिक

 महिला प्रीमियर लीगमधील सातवा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडला. डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा आठ गडी राखून पराभव केला. मुंबई इंडियन्सने या स्पर्धेतील सलग तिसरा विजय नोंदवला. दिल्लीने मुंबईला विजयासाठी 106 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युतरात मुंबईने 2 बाद 109 धावा करून विजय मिळवला.

Advertisement

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://www.spreaditnow.in

Advertisement