गेल्या काही दिवसांपूर्वी कसबा, पिंपरी चिंचवड निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. अशातच आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीची जय्यत तयारी सर्वच पक्षांनी सूरू केली आहे. याचसंदर्भात काल (9 मार्च) ला रात्री महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये 2024 च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एकत्रित लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवून देयची आहे असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उद्धव ठाकरे, जयंत पाटील उपस्थित होते अशी माहिती राऊतांनी दिली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://www.spreaditnow.in