SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट महत्वाच्या घडामोडी


नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी- सतेज पाटील

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशातच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेसचे गटनेते आ.सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत केली आहे.

Advertisement

महाविकास आघाडी राज्यभर एकत्रितपणे सभा घेणार

महाविकास आघाडीच्या आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्रात एकत्रितपणे सभा घेण्याचे ठरवण्यात आले आहे. ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्रितपणे एप्रिल व मे महिन्यात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण व उत्तर महाराष्ट्रात सभा घेण्याचे ठरवले. उद्धव ठाकरे व अजित पवार यांच्या नेतृत्वात या सभांचे आयोजन केले जाणार आहे. 15 मार्चला तिन्ही पक्षांच्या जिल्हा प्रमुखांची बैठक होणार आहे.

Advertisement

पेपरफुटी प्रकरणी चार शिक्षकांचं निलंबन

बारावी गणित पेपरफुटी प्रकरणी चार शिक्षकांचं निलंबन करण्यात आलं आहे. बुलढाणा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Advertisement

मध्य प्रदेशमध्ये महिलांसाठी 7 दिवसांच्या रजेची घोषणा

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देशातील प्रमुख राज्यांपैकी एक असलेल्या मध्य प्रदेशमध्ये महिलांसाठी 7 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महिला कर्मचाऱ्यांना 7 दिवसांची अतिरिक्त प्रासंगिक रजा (CL) जाहीर केली. महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार या सुट्ट्यांचा वापर करता येणार आहे.

Advertisement

चौथ्या कसोटी सामन्याला ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज उपस्थित राहणार

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना आजपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा शेवटचा सामना आहे. या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://www.spreaditnow.in

Advertisement