SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का?

आज विधानसभेत अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन विधानसभेत विरोधी पक्षनेते चांगलेच आक्रमक झाले. विरोधकांनी कांदाप्रश्न, अवकाळी पाऊस, नाफेडकडून पिकांची खरेदी यावरुन आवाज उठवला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यावरुन सरकारला धारेवर धरून विधानसभेत सभात्याह केला आहे.

अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आश्वासन दिले. शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करण्यात येणार आहे. पंचनामे सुरु आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून पंचनामे पुर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना भरघोस मदत केली जाणार आहे. हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Advertisement

तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील सरकार न्याय देणार आहे. कांद्याला क्विंटलप्रमाणे न्याय दिला जाईल. शेतकऱ्यांच्या मागे सरकार खंबीरपणे उभं राहिलं.  शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://www.spreaditnow.in

Advertisement