SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट महत्वाच्या घडामोडी


देशात क्रेडिट कार्डच्या वापरात 29.6 टक्क्यांची विक्रमी वाढ

देशातील डिजिटायझेशनला चालना मिळत असून क्रेडिट कार्डच्या वापरामध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक आकडेवारी जारी केली आहे. जानेवारी महिन्यात क्रेडिट कार्डच्या वापरात सर्वात जास्त वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात भारतात क्रेडिट कार्डच्या वापरात 29.6 टक्क्यांची विक्रमी वाढ झाली आहे. या माध्यमातून होणारी उलाढाल 1.87 लाख कोटीवर पोहोचली असून तो एक विक्रम आहे.

Advertisement

विधानसभेत आज महिला ‘लक्षवेधी’

आज महिला दिन असल्याने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये राज्याच्या प्रस्तावित महिला धोरणावर चर्चा केली जाणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील महिला सदस्य या धोरणासंदर्भात सूचना मांडतील. यामध्ये यशोमती ठाकूर, देवयानी फरांदे, भारती लव्हेकर, मंदा म्हात्रे, श्वेता महाले, यामिनी जाधव, जयश्री जाधव, सरोज अहिरे यांचा समावेश आहे.

Advertisement

प्रणिती शिंदेंचं पंतप्रधान मोदींवर टीकास्र!
काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. लोकशाही ही लोकांची शाही असते… लोकांची हुकूमशाही असते, कोणत्या पंतप्रधानांची हुकूमशाही नसते. आम्ही आमदार आमच्या घरी असतो, तुमच्यासाठी आम्ही नोकर आणि सेवकच असतो, असं विधान प्रणिती शिंदे यांनी केलं. त्या सोलापूर येथे एका कार्यक्रमाला संबोधित करत होत्या.

शेतकरी अडचणीत, द्राक्षाचे दर कोसळले
बदलत्या वातावणामुळे द्राक्ष शेतकरी मोठया अडचणीत सापडला आहे. निर्यातक्षम द्राक्षाच्या दरात मोठी घसरण झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. सध्या द्राक्षाला 25 ते 30 रुपये किलो इतका कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा उत्पन्न खर्च वजा जाता हातात काहीच शिल्लक राहत नसल्याची स्थिती आहे.

Advertisement

दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय
महिला प्रीमिअर लीगच्या हंगामातील पाचवा सामना यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने 42 धावांनी शानदार विजय मिळवत ग्रुपमधील पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवले आहे. दिल्लीने यूपीसमोर 212 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://www.spreaditnow.in

Advertisement