SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट महत्वाच्या घडामोडी

हवामान खात्याकडून अलर्ट जारी

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. भारतीय हवामान खात्याने अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार 6 ते 8 मार्च दरम्यान मध्य आणि पश्चिम भारतात  वादळासह पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Advertisement

चीन मोबाईलद्वारे सैनिकांची करतोय हेरगिरी

भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून वाद कायम आहे. अशातच चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण गुप्तचर यंत्रणांनी चिनी मोबाईलबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. चीन देश मोबाईलद्वारे सैनिकांची हेरगिरी करत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Advertisement

बारावी गणित पेपरफुटी प्रकरणाचा तपास एसआयटीकडे

राज्यभरात गाजलेल्या इयत्ता बारावीचा गणित पेपर सोशल मीडियाद्वारे फुटल्याची घटना तीन मार्च रोजी बुलढाण्यातील सिंदखेड राजा तालुक्यात घडली. या प्रकरणाचा व्यवस्थित तपास करण्यासाठी एसआयटी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. याप्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. यामध्ये अटक केलेल्या दोन आरोपी शिक्षकांना 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Advertisement

प्रियांका चोप्राची सिटाडेल वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

प्रियांका चोप्राची सिटाडेल ही  थ्रिलर वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रियांकाची ही हॉलिवूड वेब सीरिज प्रेक्षकांना अॅमेझॉन प्राइमवर प्रेक्षकांना बघता येणार आहे. सिटाडेल सीरिजचा पहिले दोन एपिसोड 28 एप्रिलला स्ट्रीम केले जाणार आहेत.

Advertisement

मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय

वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सने दुसरा विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सने RCB वर नऊ गडी राखून विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 9 गडी राखून पराभव केला.

Advertisement

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://www.spreaditnow.in

Advertisement