SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट महत्वाच्या घडामोडी

बदलत्या वातावरणानुसार IMA चा इशारा

गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदलत आहे. त्यामुळे ताप, सर्दी, फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे घेत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने एक अॅडव्हायझरी जारी केली आहे आणि प्रतिजैविक अँटिबायोटिक्स टाळण्याचा सल्ला दिला आहे. 

Advertisement

श्रीलंकेन पाकिस्तानला दिला झटका

श्रीलंका देशाने पाकिस्तानला झटका दिला आहे. आमच्यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ देणार नाही, असं म्हणत श्रीलंकेने चीनला खडेबोल सुनावले आहे. भारत विरुद्ध चीन सीमेवरील तणाव कायम आहे. असे असताना चीन भारताशेजारील देशांचा वापर करण्याचा प्रयत्न करतोय.

Advertisement

देशाचे चित्र बदलत चालले आहे – शरद पवार

पुणे निवडणुकीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक टीका केली आहे. सरकार त्यांचं, सत्तेचा वापर त्यांचा हे पदवीधर आणि कसबा निवडणुकीत दिसून आले. पुण्याच्या निवडणुकीबाबत मी काही सांगण्याची गरज नाही ते जगजाहीर आहे. त्यामुळे आता निष्कर्ष काढणे योग्य नाही. अशा शब्दात पवारांनी सत्ताधारींवर टोला लगावला आहे.

Advertisement

दादासाहेब फाळके स्मारकाचा पुनर्विकास होणार

महापालिकेच्यावतीने दादासाहेब फाळके स्मारकाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाकडून चित्रनगरीच्या विकासासाठी 50 कोटी रुपयांची मागणी पत्रअन्वये करण्यात आली आहे.

Advertisement

मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा केला पराभव

वुमन्स प्रीमियर लीगच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा 143 धावांनी पराभव केला. त्यामुळे मुंबई इंडियन्सने 2023 ची दणक्यात सुरूवात केली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Advertisement