उन्हाळ्यात चेहरा ताजातवाना राखण्यासाठी दोन चमचे बेसन, हळद, गुलाब पाणी घालून त्याचा लेप बनवून चेहरा, हातपाय आणि मानेवर लावून 10 मिनिटांनी धुऊन टाका. यामुळे त्वचा सुंदर व स्वस्थ बनेल.
– डोळ्यांची आग व डार्क सर्कल कमी करण्यासाठी रात्री झोपताना डोळ्यांवर थंड दुधाच्या पट्ट्या ठेवाव्यात.
– ओठांना सुंदर व मऊ बनविण्यासाठी रात्री झोपताना साय लावा आणि सकाळी थंड पाण्याने धुऊन टाकावे.
– दुधात हळद घालून त्याची पेस्ट तयार करावी. पेस्ट चेहऱ्यावर आणि हातापायावर लावावी.
– आठ ते दहा दिवसांनी एकदा चेहऱ्यावर वाफ जरूर घ्यावी. या पाण्यात पुदिनाची पानं, तुळशीची पानं, लिंबाचा रस व मीठ घालावे.
– उन्हात जाण्यासाठी सन स्क्रीन लोशन लावून बाहेर पडा.
_*आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा*_ https://www.spreaditnow.in