आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे. आपण फोनमध्ये काही गोष्टी सुरक्षित राहण्यासाठी पासवर्ड सेट करत असतो. मात्र हाच पासवर्ड आपल्यासाठी कधी-कधी डोकेदुखी ठरतो. जर तुम्ही मोबाईलचा पासवर्ड विसरले तरीसुद्धा फोन चालू करू शकता.
- सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमचा स्मार्टफोन बंद करा.
- त्यानंतर स्क्रीन चालू होईपर्यंत तुमच्या फोनची पॉवर आणि व्हॉल्युम डाऊन ही बटणे एकत्रितपणे प्रेस करा. असे केल्यामुळे तुमचा फोन रिकव्हरी मोडमध्ये जाईल व तुम्हाला स्क्रीनवर अनेक मोड दिसतील.
- त्यामध्ये तुम्हाला पॉवर ऑफ, ग्राफिक टेस्ट, लोकल टेस्ट, रिकव्हरी लॉक आणि वाइप डेटा किंवा फॅक्टरी रीसेटचा पर्याय दिसेल. यामधील तुम्हाला फॅक्टरी रिसेटचा पर्याय निवडावा लागेल.
- कोणताही पर्याय निवडण्यासाठी तुम्हाला व्हॉल्युम अप किंवा डाऊन हे बटण वापरावे लागणार आहे.
- तसेच त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा हे कन्फर्मेशन द्यावे लागेल.
- असे केल्याने तुमच्या फोनमधील डेटा निघून जाईल व तुमचा फोन अगदी नवीन फोनसारखा होईल.