फिफा पुरस्कार सोहळ्यात लिओनेल मेस्सी हा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. तर स्पेन संघाची ॲलेक्सिया पुटेलस सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू पुरस्काराची मानकरी ठरली आहे. मेस्सीला पॅरिसमध्ये 2022 सालचा फिफा प्लेयर ऑफ द इयरचा किताब देण्यात आला आहे. मेस्सीने फ्रान्सच्या किलियन एमबाप्पेला मागे टाकत या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे.
सर्वोत्कृष्ट फिफा फुटबॉल पुरस्कार विजेते :
सर्वोत्मम फिफा पुरुष खेळाडू : लिओनेल मेस्सी
सर्वोत्कृष्ट फिफा महिला खेळाडू : अलेक्सिया पुटेलस
सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष गोलकीपर : एमिलियानो मार्टिनेझ
सर्वोत्तम फिफा महिला गोलकीपर : मेरी इर्प्स
सर्वोत्कृष्ट फिफा महिला प्रशिक्षक : सरिना विगमन
सर्वोत्तम फिफा पुरुष प्रशिक्षक : लिओनेल स्कालोनी
फिफा पुस्कास पुरस्कार : मार्सिन ओलेक्सी
फिफा फेअर प्ले अवॉर्ड : लुका लोचोशविली
फिफा फॅन अवॉर्ड : अर्जेंटिनियन चाहते