आज विधानसभा अर्थसंकल्पाचा दुसरा दिवस चांगलाच गाजला. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. यावर आमदार प्रकाश सोळंके यांनी शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार असा प्रश्न उपस्थित केला.
अशातच अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निश्चित तारीख सांगा अशी आग्रही मागणी केल्यावर मुख्यमंत्र्यांनी 31 मार्चपर्यंतची घोषणा केली.
अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी 755 कोटींचे वाटप झाले आहे. यामध्ये 3300 कोटींची अतिरिक्त मागणी करण्यात आलेली आहे. याशिवाय शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तींच्या मदतीसाठी दिल्या जाणाऱ्या 6800 कोटींपैकी 6000 कोटींचे वाटप झाले आहे तर 800 कोटींचे बाकी आहे व नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजारांच्या अनुदानापोटी 4700 कोटींचे वाटप झाले आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात दिली.