शेतकऱ्यांसाठी खुशखबर! अखेर आज PM किसान योजनेचा तेरावा हप्ता जमा होण्याची शक्यता, पाहा लाभार्थ्यांची यादी
शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत 12 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून शेतकरी तेराव्या हप्त्याची वाट पाहत होते. अखेर आज PM किसान योजनेचा तेरावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आज शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे.
दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी सर्व कागदपंत्राची पूर्तता केली आहे आणि ज्यांचे आधारकार्ड बँक खात्याला संलग्न आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत कि नाही, यासाठी तुम्ही नाव नोंदवले असेल आणि तुम्हाला तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही? हे शोधायचे असेल तर तुम्ही https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://www.spreaditnow.in