कर्मचारी निवड आयोगाने SSC CGL टियर II च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. SSC CGL टियर II च्या परीक्षा 2 मार्च ते 7 मार्च दरम्यान होणार आहेत. जे उमेदवार टियर l पास झाले आहेत असे उमेदवार टियर ll ची परीक्षा देऊ शकतात. टियर ll चे संबंधित उमेदवार आता आयोगाच्या अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन SSC CGL टियर II परीक्षेचे वेळापत्रक डाऊनलोड करू शकतात.
असे करा वेळापत्रक डाउनलोड
– प्रथम ssc.nic.in या आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
– त्यानंतर तुमच्यासमोर आलेल्या लिंकवर क्लिक करा.
– लिंकवर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर एक नवीन PDF ओपन होईल.
– या PDF मध्ये तुम्ही तुमचं वेळापत्रक पाहू शकता. व प्रिंट देखील काढू शकता.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://www.spreaditnow.in