SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज कमी होतेय? मग वाचा खास टिप्स..

भारतात इलेक्ट्रिक स्कूटरचा ट्रेंड अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात असून येत्या काही वर्षांत इलेक्ट्रिक स्कूटरच्या बाजारपेठेची भरभराट होईल. इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज बॅटरीवर आणि स्पीडवर जास्त अवलंबून असते. पण ही रेंज याशिवाय अनेक गोष्टींवर अवलंबून असते. जर तुमच्याकडेही इलेक्ट्रिक स्कूटर असेल तर काही महत्वाच्या टिप्स जाणून घ्या म्हणजे स्कूटरची रेंज वाढवण्यास मदत होईल.

▪️ बॅटरी अपग्रेड करा: जर बॅटरी उघड्यावर ठेवली तर ती धोकादायक ठरू शकते तर 15 टक्के बॅटरी शिल्लक असताना बॅटरी चार्ज करावी. या रीतीने बॅटरीची काळजी घेतल्यास बॅटरी क्षमता शाबूत राहते. जर बॅटरीची स्थिती चांगली नसेल तर नवीन बॅटरी घेणे उत्तम असते.

Advertisement

▪️ टायर प्रेशर: टायरमधील हवेची योग्य पातळी राखल्याने इलेक्ट्रिक स्कूटरवर कमी दाब येतो. टायरमधील हवा कमी असली की टायर हवेबरोबर जास्त हलेल, ज्यामुळे मोटरला जास्त काम करावे लागेल आणि बॅटरी खर्च वाढण्यात होतो .

▪️ इलेक्ट्रॉनिक्स: सध्या बाजारात येणाऱ्या अनेक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्मार्ट फीचर्स असतात. त्यात ब्लूटूथ आणि स्मार्ट नेव्हिगेशनही यांचाही समावेश असतो. पण आवश्यकता नसताना ब्लूटूथ, एलईडी, डीआरएल आणि हेडलॅम्प बॅटरी खर्च करणाऱ्या गोष्टी बंद करणे योग्य ठरते.

Advertisement

▪️ वजन: जर इलेक्ट्रिक स्कूटरवर जास्त वजनाची ने-आण केली तर स्कूटरची रेंज कमी होते, पण वजन हलके असेल तर त्यापटीत तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटरची चांगली रेंज मिळू शकते.

▪️ पॉवर सेव्हिंग मोड आणि ब्रेक्स: इलेक्ट्रिक स्कूटर चालवताना पॉवर सेव्हिंग मोडचा वापर करा. स्कूटरची कार्यक्षमता कमी असेल, तर ती कमी वेगाने चालवा. उच्च कार्यक्षमता असलेली स्कूटर जास्त वेगाने चालवता येते. वाढता वेग आणि सारखा ब्रेक लावणे टाळा. कमी वेगात गाडी चालवली म्हणजे बॅटरी कमी खर्च होईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement