SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या..

✊ राज्य सरकारी कर्मचारी 14 मार्चपासून बेमुदत संपावर, जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी कर्मचारी संपावर जाणार

✒️ कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा राजकारणातून निवृत्त; म्हणाले – निवडणूक लढणार नसलो तरी राजकारणात सक्रिय राहणार

Advertisement

⚖️ सुप्रीम कोर्टाचा मेन्स्ट्रुअल लीव्हवर सुनावणी करण्यास नकार; CJI म्हणाले – एम्प्लॉयर्सना सुट्टी देण्याची सक्ती केली, तर ते महिलांना काम देणे टाळतील

🧢 ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स इंदौर कसोटी खेळणार नाही, उपकर्णधार स्टीव्ह स्मिथकडे जबाबदारी; 3री कसोटी 1 मार्चला

Advertisement

😓 माजी आमदार देवीसिंह शेखावत यांचे 89व्या वर्षी निधन, पुण्यातील केईएम रुग्णालयात त्यांच्यावर सुरू होते उपचार; आज सायंकाळी अंत्यसंस्कार

🎬 फास्ट अँड फ्युरियस चित्रपट: 10व्या भागाने रिलीज होण्यापूर्वीच केला विक्रम, रिलीजच्या तीन महिने आधीच अ‍ॅडव्हान्स बुकिंग, चित्रपट 19 मे ला रिलीज होणार

Advertisement

🗳️ पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 26 तारखेला मतदान होणार, आज संध्याकाळी 5 वाजेनंतर प्रचाराच्या तोफा थंडावल्या

📉 शेअर मार्केटमध्ये घसरण: सेन्सेक्स 141 अंकांच्या घसरणीसह 59,463.93 वर बंद, निफ्टी 45 अंकांच्या घसरणीसह 17,465.80 वर बंद

Advertisement

🪙 सोन्याचे दर: मुंबईत आज 24 कॅरेट प्रती 10 ग्रॅम सोने 56510 रुपयांना तर 22 कॅरेट सोन्याचे दर 51700 रुपये प्रति 10 ग्रॅम
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement