शेतकरी बांधवांसाठी सरकारकडून एक मोठी योजना राबवली आहे. या योजनेचा फायदा सर्वसामान्य शेतकरी घेऊ शकतात. प्रत्येक राज्यातून अनुसूचित जाती, जमाती मधील शेतकरी प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेचा फायदा घेऊ शकतात. अनुसूचित जाती मधील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान देण्यात येणार आहे. जेणेकरून शेतकरी शेतीसाठी उपयुक्त असा ट्रॅक्टर खरेदी करू शकेल. या योजनेमुळे शेतकरी शेतीचे उत्पन्न दुप्पट करू शकतील.
सरकारने हि योजना सर्वच राज्यांमध्ये लागू केली आहे. यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण या विभागमार्फत ट्रॅक्टर खरेदीवर तीन लाख रुपये अनुदान दिले जात आहे. या योजनेतुन शेतकऱ्यांना 35 HP पेक्षा जास्त ताकद असणारा ट्रॅक्टर खरेदी करता येणार आहे.
केंद्र सरकारने या योजनेसाठी 90 लाख रुपये अनुदान दिले आहे. तर प्रत्येक जिल्ह्यासाठी सुमारे 30 ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना https://kissantractoryojana.in/register.php या संकेस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. अधिक माहितीसाठी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करू शकता.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
रेशनकार्ड
आधारकार्ड
मोबाईल नंबर
शेतीचा सातबारा उतारा
पासबुक झेरॉक्स
पॅन कार्ड