जगभरात मागील दोन वर्षांत अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाल्याचं दिसलं. आता मोठी बातमी समोर आली आहे. नेटफ्लिक्सने 100 पेक्षा जास्त देशांमध्ये सदस्यत्वाची किंमत कमी केलीय. यावरून कमी उत्पन्न असलेल्या प्रदेशांमध्ये जेथे कंपनीचे कमी ग्राहक आहेत, अशा ठिकाणी हे दर कमी केलेत.
जगभरात पाहिला जाणारा ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणून नेटफ्लिक्स नावाजलेलं आहे. तर, या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या जगभरातील वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपट, वेब सीरिज, शो या कंटेंटमुळे लोक या ओटीटी प्लॅटफॉर्मशी जोडले गेले आहेत. आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेटफ्लिक्सने त्यांचे सबस्क्रिप्शन दर आणखी कमी केले आहेत.
काहीच महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्सने भारतातील सबस्क्रिप्शन दर कमी केले होते. आता नेटफ्लिक्सचे नवे दर भारतात नव्हे, तर मध्य पूर्व देशांमध्ये स्वस्त झाले आहेत. युजर्स वाढवायचे असल्याने कंपनीने आपल्या सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये जवळपास 400 रुपयांपर्यंत कपात केली आहे. नेटफ्लिक्सकडून सध्या अनेक नवे प्लॅन्स वेगवेगळ्या किंमती आणि वैशिष्ट्यांसह ऑफर केले जात आहेत.
नेटफ्लिक्सने येमेन, इराक, ट्युनिशिया, जॉर्डन, पॅलेस्टाईन, लिबिया, अल्जेरिया, लेबनॉन, इराक, सुदान यांसारख्या मध्य पूर्व देशांमध्ये नेटफ्लिक्स प्लॅन स्वस्त केले आहेत. या देशांमध्ये, नेटफ्लिक्सचा मूळ प्लॅन 7.99 डॉलर्स म्हणजेच जवळपास 661 रुपयांना होता, ज्याची किंमत आता 3 डॉलर म्हणजेच 248 रुपये इतकी करण्यात आली आहे. म्हणजेच या रिचार्ज प्लॅनमध्ये तब्बल 400 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर, प्रीमियम प्लॅनमध्ये देखील दर कमी झाले आहेत. प्रीमियम प्लॅन 11.99 डॉलरवरून 9.99 डॉलरपर्यंत कमी करण्यात आली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in