SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मुन्नाभाई-सर्किटची पुन्हा दिसणार जोडी, ‘या’ चित्रपटात होणार एंट्री?

बॉलिवूड अभिनेता खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘सेल्फी’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचं दिसत आहे. नुकताच त्याने अवघ्या तीन मिनिटांत तब्बल 183 सेल्फी क्लिक करण्याचा विक्रम केला असून त्याच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. आता अक्षयच्या, मुन्नाभाई-सर्किटच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.

सध्या चित्रपटाच्या सेटवरील व्हायरल झालेल्या फोटोनुसार, अक्षय कुमारने त्याच्या सर्वात हिट आणि कॉमेडी फ्रेंचायजी ‘हेरा फेरी 3’ च्या चित्रीकरणालाही सुरुवात केली असून चित्रपटाच्या सेटवरील त्याची पहिली झलकदेखील समोर आली आहे. पण त्याचा आणखी एक नवीन कॉमेडी चित्रपट देखील येणार आहे.

Advertisement

अक्षय कुमार लवकरच त्याच्या ‘वेलकम’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सिरीजच्या तिसऱ्या भागाच्या शूटिंगला सुरु करणार आहे. एका रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाचे नाव आधी ‘वेलकम टू द जंगल’ असे ठेवण्यात आले होते. मात्र, आता निर्मात्यांनी याचे नाव ‘वेलकम 3’ असे ठेवले असल्याची माहीती मिळत आहे. जो 2024/25 च्या सुरुवातीला रीलीज होऊ शकतो.

‘वेलकम 3’मध्ये अक्षय कुमारसोबत मुन्नाभाई आणि सर्किटची जोडी झळकणार आहे. म्हणजेच या चित्रपटात संजय दत्त आणि अर्शद वारसी देखील दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग कधी होणार आणि दिग्दर्शन कोण करणार याचा खुलासा अद्याप झालेला नाही. या चित्रपटाच्या सिरीजच्या दुसऱ्या भागात म्हणजेच ‘वेलकम बॅक’मध्ये अक्षय कुमारच्या जागी जॉन अब्राहमला घेण्यात आले होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement