SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला ‘या’ चित्रपटाला..

एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ आणि विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटांचा दादासाहेब आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ‘RRR’ या चित्रपटाला फिल्म ऑफ द इयर आणि ‘द काश्मीर फाइल्स’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला.

रेखा यांचा चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. आलिया भट्टने ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ सोहळ्यात हजेरी लावली होती. रणबीर कपूर आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईबाहेर असल्याने तो या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित नव्हता. त्यामुळे आलियाने रणबीरच्या वतीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार स्वीकारला.

Advertisement

अवॉर्ड्स आणि विनर्सची यादी:

▪️ बेस्ट फिल्म – द काश्मीर फाइल्स
▪️ फिल्म ऑफ द ईयर – RRR
▪️ बेस्ट अ‍ॅक्टर – रणबीर कपूर (ब्रह्मास्त्र)
▪️ बेस्ट अ‍ॅक्ट्रेस – आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाड़ी)
▪️ क्रिटिक्स बेस्ट अ‍ॅक्टर – वरुण धवन (भेड़िया)
▪️ क्रिटिक्स बेस्ट अ‍ॅक्ट्रेस – विद्या बालन (जलसा)
▪️ बेस्ट डायरेक्टर – आर बाल्की (चुप)
▪️ बेस्ट सिनेमॅटोग्राफर – पीएस विनोद (विक्रम वेधा)
▪️ मोस्ट प्रॉमिसिंग अ‍ॅक्टर – ऋषभ शेट्टी (कांतारा)
▪️ बेस्ट अ‍ॅक्टर सपोर्टिंग रोल – मनीष पॉल (जुग-जुग जियो)
▪️ बेस्ट प्लेबॅक सिंगर मेल – सांचेत टंडन (जर्सी- माइया मैनूं)
▪️ बेस्ट प्लेबॅक सिंगर फीमेल – नीति मोहन (गंगूबाई काठियावाड़ी- मेरी जान)
▪️ बेस्ट वेब सिरीज – रुद्र (हिंदी)
▪️ मोस्ट व्हर्सेटाइल अ‍ॅक्टर – अनुपम खेर (द कश्मीर फाइल्स)
▪️ टेलीविजन सिरीज ऑफ द ईयर – अनुपमा
▪️ बेस्ट अ‍ॅक्टर इन टेलिव्हिजन सिरीज – जेन इमाम (फना)
▪️ बेस्ट अ‍ॅक्ट्रेस इन टेलिव्हिजन सिरीज – तेजस्वी प्रकाश (नागिन)
▪️ आउट स्टँडिंग काँट्रिब्यूशन इन फिल्म इंडस्ट्री – रेखा
▪️ आउट स्टँडिंग काँट्रिब्यूशन इन म्युझिक इंडस्ट्री – हरिहरन
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement