केंद्र सरकार मत्स्य संपदा साठवणूक करणे व वितरण करण्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबविण्यासाठी प्रथमच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 20 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री परशोत्तम रूपाला यांनी दिली आहे. पालघर जिल्ह्यामधील सातपाटी येथे नुकतेच महामत्स्य अभियानाच्या माध्यमातून सागर परिक्रमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी श्री. रूपाला बोलत होते.
केंद्रीय मंत्री श्री. रूपाला यांनी म्हटलं की, किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकरी बांधवांना जसं 7 टक्के दराने कर्ज उपलब्ध करून दिलं जात आहे, त्याच धर्तीवर मच्छीमार बांधवांनाही 7 टक्के दराने कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेचा सर्व मच्छीमार बांधवांनी नक्की लाभ घ्या’, असं त्यांनी आवाहन केलं आहे.
मत्स्य उत्पादन अधिक काळ टिकण्यासाठी शीतगृहाची सुविधाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुढच्या पिढीलादेखील मत्स्य उत्पादनाचा लाभ मिळावा यासाठी मत्स्य संगोपन व संवर्धनासाठी मच्छीमार बांधवांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री. रूपाला यांनी केले.
मच्छीमार बांधवांना डिझेल परतावा मिळण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो तसेच डिझेल परतावा मिळण्यासाठी विलंबही होतो. डिझेल परतावा वेळेवर मिळावा यासाठी प्रशासकीय यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच भविष्यामध्ये याविषयी कायदा करण्याची आवश्यकता असल्यास राज्य शासन मच्छीमारांच्या हितासाठी कायदाही करेल, असे श्री. मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in