आवडत्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 10वी नंतर अनेक विद्यार्थी उत्सुक असतात. त्यानंतर बी.ई. झालं की, काहींना नोकरी लागते तर काही स्वतःचा बिझनेस करतात. कोणाचं लहानपणापासून स्वप्न असतं तर कोणाला आवड म्हणून फक्त करून बघायचं असतं, असं हे पॉलिटेक्निक चांगल्या गुणांनी यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना करिअर मध्ये यशस्वी देखील बनवतं.
⚙️ जर तुम्ही पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये अर्ज करण्याची तयारी करत असाल, तर आज आम्ही प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्सची तुम्हाला नक्की मदत होईल.
● पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी आपल्याला चांगल्या गुणांची गरज असते. 10वी मध्ये चांगल्या गुणांनी पास होऊनही या क्षेत्रात स्पर्धा ही नेहमीच दिसते. म्हणून आपल्याला गुणांची भूक हवीच.
● परीक्षेची तयारी सुरु करण्याआधी सिलॅबस पॅटर्नविषयी संपूर्ण माहिती घ्या. परीक्षेत येणाऱ्या सर्व विषयांच्या सिलॅबसची आधीच माहिती घेऊन वाचा आणि कितपत जमू शकतं, अंदाज लावा.
● कोणत्याही विषयाकडे सोपं आहे म्हणून दुर्लक्ष करु नका. कारण त्यामुळे तुम्हाला परीक्षेत कमी गुण मिळण्याची शक्यता असते.
● परीक्षेची तयारी करताना वेळेचं नियोजन करून घ्या आणि वेळ वाया जाणार नाही, याची काळजी नक्की घ्या. कठीण विषयाच्या अभ्यासाला जास्त वेळ द्या आणि प्रवेश घेण्यापूर्वी सुटीमध्ये आपल्या इंजिनिअरिंग झालेल्या नातेवाईक, भाऊ-बहीण यांच्याकडून विषय समजून घ्या.
● परीक्षेत जास्तीत जास्त प्रश्न ज्या पुस्तकांमधून विचारले जातात, अशा पुस्तकांचा जास्त अभ्यास करा. इतर प्रश्न तुम्ही किती सराव केला आणि क्लासमध्ये किती लक्ष दिलं व अभ्यास किती केला यावरून मिळवलेले गुण समजतीलच.
● जेव्हा तुम्ही अभ्यास करायला सुरुवात कराल, तेव्हा उत्तरे लक्षात ठेवण्यासाठी शॉर्टमध्ये आपल्या भाषेत नोट्स तयार करा. फॉर्म्युला असेल किंवा थोडक्यात लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स असतील त्यांचा वापर करून उत्तरे लक्षात ठेवण्यासाठी प्रयत्न करावा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in