SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारताच्या सर्वबाद 262 धावा, ‘या’ अष्टपैलू खेळाडूची दमदार फलंदाजी..

बॉर्डर-गावस्कर चषकातील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना सुरू आहे. काल (ता. 17 फेब्रुवारी) भारत पहिल्या डावात बिनबाद 21 धावांवरून कसोटी सामन्याच्या आज (ता. 18 फेब्रुवारी) दुसऱ्या दिवशी सर्वबाद 262 धावा करू शकला आहे. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लॉयनने 5 विकेट घेतल्या आहेत.

भारताचा पहिला डाव 262 धावांवर संपला असताना आता ऑस्ट्रेलिया पहिल्या डावाच्या आधारे अवघ्या एका धावेने आघाडीवर आहे. कारण ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 263 धावा केल्या होत्या. दिल्लीतील या मैदानावर
दोन्ही संघाचे फिरकीपटू चेंडू टर्न घेत असल्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहेत.

Advertisement

कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आज भारताच्या फलंदाजी करताना कमी धावांमध्ये अधिक विकेट्स पडल्या. अक्षर पटेलने भारताकडून शानदार खेळ करत अखेरपर्यंत खेळपट्टी वर थांबत सर्वाधिक 74 धावा केल्या, विराट कोहलीने 44 धावा केल्या. याशिवाय रविचंद्रन अश्विनने 37 आणि रोहित शर्माने 32 धावा केल्या.

दरम्यान दुसऱ्या डावाला सुरुवात झाली असून ऑस्ट्रेलिया 1 बाद 61 धावांवर खेळत आहे. सलामीला उतरलेला फलंदाज उस्मान ख्वाजाला रविंद्र जडेजाने बाद केले आहे. आता सध्या ट्रेविस हेड 39 धावांवर आणि मार्नस लाबूशेन 16 धावांवर खेळत असताना दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. आता उद्या अधिक विकेट्स घेण्यासाठी भारताला गोलंदाजीची धार वाढवत कमी धावांत ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळावा लागणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement