आज (ता. 17 फेब्रुवारी) सुरू झालेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील दिल्लीतल्या दुसऱ्या कसोटीत कांगारुंचा पहिला डाव भारतीय गोलंदाजीच्या भेदक माऱ्याने लवकरच संपुष्टात आला आहे. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
आजच्या कसोटीत नाणेफेक जिंकून पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 263 धावांवर ऑल आऊट झाला आहे. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने 81, पॅट कमिंसने 33 धावा आणि पीटर हँड्सकोम्बने चांगली लढत देत नाबाद 72 धावा केल्या आहेत. याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला खास धावा काढता आल्या नाहीत.
वेगवान आणि फिरकी माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाच्या संघाने लोटांगण घेतल्याचं दिसलं. भारताकडून मोहम्मद शमीने 4 विकेट्स घेतल्या. तर आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी पुन्हा कांगारुंना फिरकीवर फिरवत प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला 263 धावांवर रोखलं. तर पहिल्या दिवसाखेर भारताच्या नाबाद 21 धावा झाल्या असून रोहित शर्मा (13) तर के. एल. राहुल 4 धावांवर नाबाद आहेत.
🧢 भारतीय संघ: रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भरत, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
🧢 ऑस्ट्रेलिया संघ: डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मारनस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स केरी, पॅट कमिंस (कर्णधार), टॉड मर्फी, नॅथन लियोन, मॅथ्यू कुह्नमॅन.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in