पीएम किसान योजना ही एक केंद्रीय योजना आहे, जी देशातील सर्व भूमीधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता आहे. या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. मात्र या योजनेचा लाभ केवळ आधार संलग्न असलेल्या बँक खातेदारांनाच होणार आहे.
या योजनेचा तेरावा हप्ता 27 फेब्रुवारी रोजी खात्यात जमा होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचे EKYC पूर्ण केले नाही त्यांना तेराव्या हप्त्याची रक्कम मिळणार नाही. पीएम किसानमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी EKYC अनिवार्य आहे.
ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी झालेले नाही, अशा शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत जाऊन ई केवायसी पूर्ण करुन घ्यावे अथवा त्यासाठी महा ई-सेवा केंद्र चालकांची मदत घ्यावी किंवा त्या शेतकऱ्यांनी बँक खाती इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये उघडावीत व बँक खात्यामध्ये जमा होईल. आधार सीडिंग प्रलंबित लाभार्थ्यांनी बँकेत जाऊन आधार सीडिंग ई-केवायसी करुन घ्यावे, त्यासाठी महा-ई-सेवा केंद्र चालकांची मदत घ्यावी अथवा बँक खाते आयपीपीबीमध्ये भारतीय डाक विभागामार्फत उघडण्यात यावेत असे पीएम किसान योजनेचे नोडल अधिकारी भगवान कांबळे यांनी सांगितले आहे.