SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुर्की-सीरियात 34 हजारांहून अधिक मृत्यू!

तुर्की-सीरियात झालेल्या भूकंपामुळे आजही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचविण्याचे काम सुरू आहे. भूकंपात मृत पावलेल्या नागरिकांच्या संख्येत अजूनही वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. जगातील 70हून अधिक देशांनी या देशांना मदत दिली आहे.

प्राप्त माहीतीनुसार, एकूण 34 हजारांहून अधिक लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. ढिगारे हटवल्यानंतर मृतदेह बाहेर काढले जात असून मृतांची संख्या दुप्पट होऊ शकते, अशी व्यक्त केली जात आहे. अनेक शहरांत मृतदेहांच्या ढिगाऱ्यात लोक आपल्या प्रियजनांचा शोध घेत आहेत, असं चित्र दिसत आहे.

Advertisement

सीरिया सीमेवरील बचावकार्य सोडून अनेक देशातील रेस्क्यू पथक माघारी फिरले आहेत. रविवारी इस्रायलसह जर्मनी आणि ऑस्ट्रियानेही तुर्कितून बचावपथके मागे घेतले आहेत. कारण म्हणजे, इस्रायलसह अनेक देशांच्या गुप्तचर यंत्रणांना तुर्किच्या सीमेवर वेगवेगळ्या गटांमध्ये हिंसक चकमकी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान आता जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ.टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी सीरियाला 110 टन वैद्यकीय पुरवठा देण्याची घोषणा केली आहे. भूकंपग्रस्त शहरांमध्ये बांधकाम कंत्राटदारांविरुद्ध चौकशी केल्यानंतर 113 तुर्की इमारत कंत्राटदारांना अटक करण्यात आली आहे. तुर्कस्तानच्या 8 प्रांतातून लुटीच्या आरोपाखाली 98 जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी 43 लोक हाते प्रांतातील आहेत, अशी माहीती आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement