SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सलमान खानचा हटके अंदाज, ‘या’ चित्रपटातील पहिले गाणे रिलीज!

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा जबरदस्त तडका असणारा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील पहिले गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. बिग बॉस 16च्या ग्रँड फिनालेमध्ये हे रोमँटिक गाणे रिलीज केले गेले आहे. ‘नय्यो लगदा’ असे या गाण्याचे बोल आहेत.

मागील अनेक दिवसांपासून शो च्या माध्यमातून चाहत्यांना दिसणारा हिमेश रेशमिया याने हे गाणे संगीतबद्ध केले असून याचे बोल शब्बीर अहमद आणि कमाल खान यांनी लिहिले आहेत. तसेच, तर गोड आवाजाच्या पलक मुच्छलने हे गाणे गायले आहे. या गाण्यात सलमानसोबत अभिनेत्री पूजा हेगडे दिसत आहे.

Advertisement

अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सचा तडका असलेल्या सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाची निर्मिती सलमान खानसह साजिद नाडियाडवालाने केली आहे. फरहाद सामजी यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. आता लवकरच प्रेक्षकांचं खास मनोरंजन होणार आहे.

दरम्यान ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, विजेंदर सिंग, भूमिका चावला, अभिमन्यू सिंग, जगपती बाबू, शहनाज गिल, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement