SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गूगलला उडविण्याची धमकी, वाचा सध्याची मोठी बातमी..

पुण्यात असलेले गुगलचे ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याची धक्कादायक बातमी समोर आली असून या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. काही दिवसांपासून देशात धमकीचे कॉल येणे मग ते राजकारणी लोकांना असो की सेलिब्रिटींना हे वाढतच चाललं आहे.

💥 पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या गुगलच्या ऑफिसमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल आला होता. कोरेगाव पार्क येथील गुगल ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फेक कॉल काल एका व्यक्तीने केला होता, यानंतर ही घटना सगळीकडे पसरली.

Advertisement

👮🏻 मुंबईतील गुगल ऑफिसमध्ये पुण्याचे गुगल ऑफिस उडवून देऊ, असा धामकीचा निनावी कॉल करण्यात आला होता. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून काल (ता. 12 फेब्रुवारी) रात्री संपूर्ण बिल्डिंगची तपासणी करण्यात आली. यावेळी संशयास्पद असं काही आढळून आलं नसलं तरी पोलिसांनी आता एका 45 वर्षीय व्यक्तीला हैद्राबादमधून ताब्यात घेतले आहे.

🧐 अशी माहीती आहे की, कॉल करणारी व्यक्ती संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत होते. त्यामुळे त्याने दारूच्या नशेत असताना हा कॉल केला होता. या व्यक्तीचा भाऊ पुण्यात राहत असून त्याला त्रास देण्याच्या उद्दीष्टाने त्याने ब्लॅकमेल केले. जेणेकरून त्याच्या भावाला त्रास होईल. मात्र, पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतले आहे.

Advertisement

📍 दरम्यान हे सर्व झाल्यानंतर धमकी देणारा फोन कॉल आला तेव्हा पोलीस अधिकारी आणि बीडीडीएस पथकाकडून गुगलच्या पुण्यातील संपूर्ण इमारतीची पाहणी करण्यात आली. यासोबतच या व्यक्तीने धमकीचा फोन केला होता त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी होत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement