राज्यातील चंद्रपुरमध्ये कृषी तंत्रज्ञान उद्यान उभारण्यात येत आहे. हे शेतकऱ्यांसाठी स्थायी व कायमस्वरुपी केंद्र असेल. पंजाब नॅशनल बँकेशी संलग्न करत अजयपूर येथे जवळपास दहा एकर जागेवर कृषी केंद्र होत आहे. आतापर्यंत हे उद्यान हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये होते. चंद्रपुरातील चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित कृषी महोत्सवात राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहीती दिली आहे.
शेतकऱ्यांना शेतीसंबंधित वेळोवेळी नवीन माहिती कायम मिळत राहावी यासाठी राज्यातील एकमेव कृषी तंत्रज्ञान उद्यान चंद्रपुर जिल्ह्यात अजयपूर येथे उभारण्यात येणार आहे. अजयपूरमध्ये जवळपास 10 एकर जागेत हे उद्यान उभारण्यात येणार असल्याची त्यांनी माहीती दिली आहे.
याशिवाय आतापर्यंत देशात हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये अशा प्रकारची उद्यानं उभारण्यात येत होती आणि आता महाराष्ट्रात देखील असं उद्यान उभारणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. या उद्यानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती संबंधित नवनवीन आणि आधुनिक गोष्टींची माहिती स्थायी आणि कायमस्वरूपी असलेल्या या माध्यमातून मिळू शकणार आहे.
मुनगंटीवार पुढे म्हणाले की, चार दिवसाच्या कृषी प्रदर्शनात अनेकदा शेतकरी उपस्थित न राहिल्यास त्यांना इतर वेळी चंद्रपूर जिल्ह्यात कायमस्वरूपी कृषी तंत्रज्ञान उद्यान सुरु केल्याने शेती संदर्भातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळवून फायदा होणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. या नवीन कृषी तंत्रज्ञान उद्यानामध्ये नवीन तंत्रज्ञानासह, नवीन बियाणांच्या जाती, संपूर्ण कंपन्यांची माहिती देण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितलं.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in