SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शाओमीचे ‘हे’ हटके डिव्हाईस कमी पैशांत करेल मनोरंजनाची मजा दुप्पट!

स्मार्ट टीव्ही घ्यायचा आणि तोसुद्धा चांगल्या क्वालिटीचा तर हे प्रत्येकाला परवडत नाही. पण आता दिग्गज टेक कंपनीने यावर कमी पैशांत हटके डिव्हाईस आणून खास काम केलं आहे. Xiaomi कंपनी येत्या 14 फेब्रुवारी तुमच्या घरातील सामान्य टीव्हीला स्मार्ट टीव्हीमध्ये बदलण्यासाठी एक छोटसं डिव्हाईस लॉंच करत आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, 14 फेब्रुवारीला Xiaomi कंपनी नवीन 4K टीव्ही स्टिक लॉंच करणार आहे. याबाबत कंपनीने ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये कंपनीने म्हटले आहे की, Xiaomi ची नवीन आणि प्रगत Xiaomi TV Stick 4K या 14 फेब्रुवारीला लॉंच होणार असून, तुम्ही फक्त एका बोटाच्या क्लिकवर मनोरंजनाचा अनुभव घेता येणार आहे.

Advertisement

Xiaomi च्या पोर्टफोलिओमध्ये आधीपासूनच Mi TV Stick आहे. त्याची किंमत 2999 रुपये आहे. आता ही नवीन लॉंच होणाऱ्या स्टिकची किंमत नेमकी किती आहे याबाबत तेव्हाच खुलासा होणार आहे. या नव्या Xiaomi TV Stick 4K ची किंमत जुन्या स्टिकपेक्षा जराशी जास्त असू शकते, पण फायदा मोठा होणार आहे.

नव्या स्टिकची फीचर्स:

Advertisement

▪️ Xiaomi कंपनीच्या 14 फेब्रुवारी रोजी लाँच होणाऱ्या Xiaomi TV Stick 4K ला पोर्टेबल डिझाइन आहे.

▪️ Xiaomi TV Stick 4K स्टीक 4K HDR स्ट्रीमिंगला सपोर्ट करेल आणि डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी ॲटमॉससाठीही सपोर्ट करेल.

Advertisement

▪️ स्टीकच्या रिमोटमध्ये Google असिस्टंटसाठी एक वेगळे बटण दिले आहे.

▪️ तसेच, इनबिल्ट ब्लूटूथ रिमोटवर नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ, डिस्ने प्लस हॉटस्टारमध्ये प्रवेश करण्यासाठी विशेष बटणंदेखील दिली आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement