जागतिक बाजारातील डॉलर्सच्या किंमतींत झालेल्या घसरणीमुळे देशभरात आजही सोन्या-चांदीच्या दरात किंचित घट झाल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यामध्ये सोन्याने सर्वोच्च पातळी गाठली होती, पण सध्या सोन्याची किंमत घसरत आहे.
आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 57,220 रूपयांवर तर 22 कॅरेट सोन्याचा दर 52,452 वर आला आहे. तसेच आज एक किलो चांदीचा दर 67,760 रूपयांवर आला आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात 70 रूपयांची घट झाल्याचे दिसून येत आहे.
प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव:
◆ मुंबई – 52,900 रुपये
◆ पुणे – 52,900 रुपये
◆ नागपूर – 52,900 रुपये
प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव:
◆ मुंबई – 57,710 रुपये
◆ पुणे – 57,710 रुपये
◆ नागपूर – 57,710 रुपये
जागतिक बाजारातदेखील आज सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याची स्पॉट प्राईस $ 2.06 ने घसरून $ 1,872.36 प्रति औंसवर तर चांदीची स्पॉट प्राईस $ 0.09% ने घसरून $ 22.19 प्रति औंसवर ट्रेड करत आहेत. आगामी 3 ते 5 वर्षांमध्ये सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून मिळाले आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in