SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

टेलिग्रामचं खास फिचर येतंय, युझर्सना होणार मोठा फायदा!

सोशल मीडियाचा वापर करायचा म्हटलं की आपण व्हाट्सअपपासून इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, टेलिग्रामपर्यंत अशा अनेक प्लॅटफॉर्म्सचा वापर करत असतो. जगभरातील लोक एकमेकांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर खूपच वाढवत आहेत.

आता Telegram ने आपल्या जगभरातील युझर्सना खास अनुभव देण्यासाठी काही नवीन फीचर्स सुरु केले आहेत. त्यापैकी एक खास फीचर्स म्हणजे रिअल टाइम चॅट ट्रान्सलेशन. याशिवाय नेटवर्क युझेस, प्रोफाईल पिक्चर मेकर, इमोजी कॅटेगरी आणि ऑटो सेव्ह मीडिया प्रमाणे काही फिचर्सदेखील या अ‍ॅपमध्ये जोडण्यात आले आहेत.

Advertisement

एका रिपोर्टनुसार, Telegram मध्ये ट्रान्सलेशनची सुविधा देखील समाविष्ट करण्यात आली आहे. ज्यामुळे आता युझर्सना रिअल टाइममध्ये संपूर्ण चॅट्स, ग्रुप्स आणि चॅनेल ट्रान्सलेट करता येणार आहे. एकदा हे फिचर ऑन झाले की ते आपोआपच संपूर्ण चॅट ट्रान्सलेट करणार असल्याची माहीती आहे.

टेलिग्रामचे हे रिअल-टाइम ट्रान्सलेशन फिचर फक्त प्रीमियम युझर्ससाठीच उपलब्ध असून हे फीचर वापरण्यासाठी युझर्सना टेलिग्रामचे प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. हे सबस्क्रिप्शन खरेदी केल्यानंतर चॅट, ग्रुप चॅट किंवा चॅनल ओपन करावे लागेल. त्यानंतर पेजच्या वरच्या बाजूला ट्रान्सलेट बार आणि सर्च बार पाहावा लागेल. ज्यावर टॅप करून भाषा निवडावी लागेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement