भारत देश ठरला दूध उत्पादनात नंबर एक
भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश ठरला आहे. कारण जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात भारताचा 24 टक्के वाटा आहे. जागतिक दूध उत्पादनात भारत हा प्रथम स्थानी आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या कॉर्पोरेट सांख्यिकी डेटाबेस मधील उत्पादनविषयक माहितीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे.
आदित्य ठाकरेंच्या गाडीवर हल्ला
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर मंगळवारी रात्री हल्ला झाला होता. हा हल्ला शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
राहुल गांधींच्या आरोपावर जीवीके कंपनीकडून स्पष्टीकरण
मुंबई विमानतळाची मालकी अदाणी समूहाला देण्यासाठी मोदी सरकारने जीवीके कंपनीवर दबाव आणला, असा आरोप राहुल गांधी यांनी काल संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना केला होता. दरम्यान, राहुल गांधींच्या या आरोपावर जीवीके कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. यासंदर्भात कंपनीचे उपाध्यक्ष संजीव रेड्डी यांनी हे आरोप फेटाळून लावले.
सिद्धार्थ आणि कियारा अडकले लग्नबंधनात
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. जैसलमेरच्या सूर्यगढ महालात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नसोहळ्याची चर्चा रंगली आहे.
पाकिस्तान क्रिकेटपटू आफ्रिदीवर दोन वर्षांची बंदी
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून आसिफ आफ्रिदीवर बंदी घालण्यात आली आहे. भ्रष्टाचारविरोधी संहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन वर्षांची बंदी घातली आहे. खैबर पख्तुनख्वामधील या डावखुऱ्या फिरकीपटूवर भ्रष्टाचार विरोधी संहितेचे दोनदा उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्यापैकी एकदाही त्याने पीसीबीला फिक्सिंगसाठी संपर्क साधल्याची माहिती दिली नाही.