SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आपल्या शरीरात लोहाची कमतरता आहे, हे कसं ओळखाल?

आपण अशक्तपणा आला की, सूप किंवा फळांचा रस घेत असतो. संत्र्याच्या रसात सी व्हिटॅमिन असतं आणि त्यामुळे शरीरात लोह शोषून घेणं सोपं जातं. म्हणून जेव्हा तुम्हाला वाटेल की प्रसन्न वाटत नाही किंवा अशक्तपणा आला आहे तेव्हा संत्री-मोसंबीचे ज्यूसदेखील तुम्ही घेऊ शकता.

पण आपल्या शरीरात लोहाची कमतरता आहे, हे कसं ओळखाल जाणून घ्या..

Advertisement

▪️ फारच थकवा आणि ताकद गेल्यासारखं होत असेल.

▪️ धाप लागत असेल.

Advertisement

▪️ नखं पांढरे व त्वचा पिवळसर दिसत असेल.

▪️ श्वास घ्यायला त्रास होत असेल.

Advertisement

▪️रक्त कमी असेल, थरकाप होत असेल.

हृदयाचे ठोके वेगाने पडत असतील तर आपल्या शरीरात लोह कमी आहे असं समजा. युनायटेड किंग्डमची आरोग्य सेवा एनएचएस आणि मेयो क्लिनिकने दिलेल्या माहितीनुसार ही रक्तक्षयाचीही सामान्य लक्षणे आहेत.

Advertisement

याशिवाय डोकेदुखी आणि चक्कर येणं, जीभ सुजणं किंवा दुखणं, भरपूर केस गळणं, कागदासारख्या अखाद्या गोष्टी खाव्याश्या वाटणं, तोंड येणं, नखं खराब होणं, सतत पाय हलवण्याची सवय असणं ही देखील काही कारणं आहेत.
यामुळे गोळ्या-औषधं घेण्याआधी तुमच्या फॅमिली डॉक्टरांकडून नक्की सल्ला घ्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement