SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गूगल देणार ChatGPT ला टक्कर, आणणार ‘हे’ नवीन टूल..

जगातील अनेक लोक घरबसल्या हातात मोबाईल असला की काही ना काही सर्च करण्यासाठी उत्सुक असतात. पण हवी ती माहीती आपणांस मिळाली की उपयोग होतो. तसेच सध्या सर्वात गुंतागुंतीच्या प्रश्नांची एका क्षणात उत्तरे देणारे ChatGPT खूपच चर्चेत आहे. पण आता या स्पर्धेत गुगलने उडी घेतली आहे.

गुगलने आपल्या सर्च इंजिनमार्फत अनेक वर्षांपासून जगभरात इंटरनेटचे जाळे पसरवले आहे. आता गुगलला असं वाटत आहे की, ChatGPT लवकरच त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. त्यामुळे कंपनीनंही याप्रमाणेच नवीन पावलं टाकण्यास सुरुवात केली असून गूगल आपलं ‘Bard’ नावाचं चॅटबॉट लॉंच करणार आहे. गुगलच्या ‘Bard’ नावाच्या चॅटबॉटची सध्या टेस्टिंग सुरू असून ते पुढील काही आठवड्यांतच लॉंच होणार आहे. बार्ड (Bard) हे Google च्या सध्याच्या लँग्वेज मॉडेल LaMDA वर तयार केले गेले आहे.

Advertisement

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले, “बार्डच्या माध्यमातून आमच्या लँग्वेज मॉडेलची ताकद, बुद्धिमत्ता आणि रचनात्मकता यासह जगातील ज्ञानाची व्याप्ती एकत्रित आणायची आहे. बार्ड सुरुवातीला LaMDA च्या लो लेव्हल व्हर्जनवर काम करेल, ज्याला कमी उर्जा लागेल जेणेकरून अधिक लोक ते एकाच वेळी वापरू शकतील”, असं ते म्हणाले. परंतु ‘बार्ड’ चुकीची किंवा अपमानकारक माहिती देऊ शकते का याबाबत त्यांनी सध्या माहीती दिली नाही.

दरम्यान ChatGPT लॉंच झाल्यापासून जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. ChatGPT तुमच्यासाठी निबंध, कोडिंग लिहू शकते, गाणी, कविता इतकंच काय तर काही सेकंदामध्ये कथाही लिहून देऊ शकतो. त्यामुळे या चॅटबॉटनं तंत्रज्ञानाच्या युगात नवी क्रांती घडणार आहे असं म्हटलं जात आहे. त्यामुळेच जगभर चॅटजीपीटीची जोरदार चर्चा झाली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement