ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज, माजी कर्णधार ॲरॉन फिंचने आज (7 फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांमधून जबरदस्त कामगिरी करणारा खेळाडू आता पुढील सामन्यांमध्ये आपल्याला खेळताना दिसणार नाही.
🫡 ॲरॉन फिंचने मागील वर्षी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून अचानकपणे निवृत्ती जाहीर करत क्रिकेटच्या चाहत्यांना धक्का दिला आहे. फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने 2015 साली एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यासोबतच 2021 साली पहिल्यांदाच टी-20 विश्वचषक जिंकला होता.
सध्या येत्या 9 फेब्रुवारीपासून नागपूरच्या मैदानावर भारत- ऑस्ट्रेलिया दरम्यान 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेस सुरुवात होणार आहे. पण ऑस्ट्रेलियाचे जॉश हेझलवूड, कॅमेरून ग्रीन, मिशेल स्टार्क यांसारखे तगडे खेळाडू जखमी असतानाच ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला ॲरॉन फिंचने निवृत्त होऊन धक्का दिला आहे.
ॲरॉन फिंचची कारकीर्द:
★ फिंचने 146 एकदिवसीय सामन्यांमध्ये 17 शतकांसह 38.89 च्या सरासरीने एकूण 5406 धावा केल्या आहेत.
दुसरीकडे, फिंचने 103 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 34.29 च्या सरासरीने 3120 धावा केल्या आहेत, ज्यात 2 शतकांचा समावेश आहे.
★ फिंचने कांगारू संघासाठी 5 कसोटी सामनेही खेळले आहेत, परंतु यामध्ये तो खास कामगिरी करु शकला नाही.
★ फिंचने कसोटीच्या 10 डावांमध्ये 27.08 च्या सरासरीने केवळ 278 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 2 अर्धशतकांची नोंद आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in