SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ प्रसिद्ध कंपनीला मोठा दिलासा, भारत सरकार 33% भागीदार होणार..

भारतामधील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या व्होडाफोन-आयडियाला भारत सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या कंपनीवर कर्जाचा भलामोठा डोंगर असताना या कंपनीबाबत भारत सरकारने 16 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त व्याज थकबाकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनीच्या 16,133 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्याज थकबाकीचे शेअर्समध्ये रूपांतर करण्यास भारत सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे व्होडाफोन-आयडियामध्ये 33 टक्के शेअर्स भारत सरकारला मिळणार असल्याने 33 टक्के भागीदारी सरकारची होणार आहे, अशी माहीती केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

Advertisement

व्होडाफोन-आयडिया कंपनीवर कर्ज असल्याने त्यांच्या व्याजाच्या थकबाकीने कंपनी आर्थिक संकटात असताना कंपनीने व्याजदेयाची रक्कम इक्विटीत रुपांतर करून भारत सरकारला देण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यास सरकारने मान्यता दिली आहे.

मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले की, “भारत सरकारने एका अटीवर या निर्णयासाठी होकार दिला. ती म्हणजे आदित्य बिर्ला समूह ही कंपनी चालवेल आणि त्यासाठी आवश्यक गुंतवणूकही आणेल, या अटीला कंपनीने होकार दर्शवला आणि आता आम्ही थकबाकीचे शेअर्समध्ये रूपांतर करण्यास सहमती दर्शविली आहे”, असं ते म्हणाले.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement